Posts

उत्पत्तीच्या पुर्वीचा इतिहास काय आहे?

Image
उत्पत्तीच्या पुर्वीचा इतिहास काय आहे? उत्पत्ती1:1 च्या आधी स्वर्गातील दृश्य पहावयास मिळते.     सर्वात प्रथम स्वर्गात कुठल्याच दुताची अथवा करूबीम ह्यांची सृष्टी देखील झाली नव्हती त्याच्या आधी पासुन देव जो एलोहीम तो होता, ना त्याची सुरुवात आहे ना त्याचा अंत आहे म्हणूनच तो सर्व समर्थ देव आहे.   त्याच्या मनामध्ये तुमच्या आमच्या विषयी चांगले विचार होते म्हणूनच आमची नावे जगाच्या स्थापनेपुर्वी कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात तेव्हाच लिहिलेली होती.    जे त्याच्या मनात विचार होते त्या प्रमाणे त्याने कृती करण्यास सुरुवात केली. सर्वात प्रथम त्याने आपल्या उपासनेसाठी स्वर्गीय दिव्यदुत ह्यांची निर्मिती केली,करुब चार प्राणी व असंख्य दुतांची निर्मिती केली. ह्या सर्वामध्ये लुसिफर, मिखायल व गब्रीयल हे अनुक्रमे ज्येष्ठ होते. सर्व जण  रात्र-दिवस त्या प्रभु परमेश्वराची स्तुती आराधना करीत होते.   पुढे ह्या सर्वामध्ये जो ज्येष्ठ व सामर्थ्यशाली लुसिफर दुत ह्याच्या मध्ये स्वार्थ आणि गर्व आला की मी सुध्दा माझे सिंहासन उंच करीन व मी सुध्दा ह्याच्याहून अधिक माझी आराधन...

बायबलच्या प्रत्येक पुस्तकात येशू

Image
  बायबलच्या प्रत्येक पुस्तकात येशू  ख्रिस्त  जुन्या   करारात   येशू  ख्रिस्त उत्पत्तीमध्ये , येशू ख्रिस्त हा स्त्री चा बीज आहे. निर्गम मध्ये , तो वल्हांडणचा कोकरू आहे . लेवीय मध्ये तो आमचा मुख्य याजक आहे . गणना मध्ये तो दिवसा ढग आणि रात्री अग्निस्तंभ आहे अनुवाद मध्ये , तो मोशे सारखा संदेष्टा आहे . यहोशवा मध्ये , तो परमेश्वराच्या सैन्याचा सेनापती आहे . शास्ते मध्ये तो आमचा न्यायाधीश आहे . रूथ मध्ये , तो आमचा जवळचा सोडवणारा नातेवाईक आहे . 1 आणि 2 शमुवेलमध्ये , तो विश्वासू संदेष्टा आहे . राजे आणि इतिहासात तो आमचा राजा आहे . एज्रा आणि नेहेम्या मध्ये , तो मानवी जीवनाच्या तुटलेल्या भिंतींचे पुनर्बांधणी करणारा आहे एस्तेरमध्ये तो आमचा मर्दखय , आमचा वकील आहे. ईयोब मध्ये तो आमचा सदैव जिवंत सोडवणारा आहे. स्तोत्र संहीता मध्ये , तो आपला मेंढपाळ आहे. नीतिसूत्रे मध्ये , तो आमचा ज्ञान आहे. उपदेशकात , तो जीवनासाठीचा अर्थ आहे. गीतरत्नात  तो आमचा प्रेमळ वर आहे यशयामध्ये तो शांतीचा राजकुमार आहे यिर्मया आणि वि...