Posts

Showing posts from April, 2021

उत्पत्तीच्या पुर्वीचा इतिहास काय आहे?

Image
उत्पत्तीच्या पुर्वीचा इतिहास काय आहे? उत्पत्ती1:1 च्या आधी स्वर्गातील दृश्य पहावयास मिळते.     सर्वात प्रथम स्वर्गात कुठल्याच दुताची अथवा करूबीम ह्यांची सृष्टी देखील झाली नव्हती त्याच्या आधी पासुन देव जो एलोहीम तो होता, ना त्याची सुरुवात आहे ना त्याचा अंत आहे म्हणूनच तो सर्व समर्थ देव आहे.   त्याच्या मनामध्ये तुमच्या आमच्या विषयी चांगले विचार होते म्हणूनच आमची नावे जगाच्या स्थापनेपुर्वी कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात तेव्हाच लिहिलेली होती.    जे त्याच्या मनात विचार होते त्या प्रमाणे त्याने कृती करण्यास सुरुवात केली. सर्वात प्रथम त्याने आपल्या उपासनेसाठी स्वर्गीय दिव्यदुत ह्यांची निर्मिती केली,करुब चार प्राणी व असंख्य दुतांची निर्मिती केली. ह्या सर्वामध्ये लुसिफर, मिखायल व गब्रीयल हे अनुक्रमे ज्येष्ठ होते. सर्व जण  रात्र-दिवस त्या प्रभु परमेश्वराची स्तुती आराधना करीत होते.   पुढे ह्या सर्वामध्ये जो ज्येष्ठ व सामर्थ्यशाली लुसिफर दुत ह्याच्या मध्ये स्वार्थ आणि गर्व आला की मी सुध्दा माझे सिंहासन उंच करीन व मी सुध्दा ह्याच्याहून अधिक माझी आराधन...