उत्पत्तीच्या पुर्वीचा इतिहास काय आहे?
उत्पत्तीच्या पुर्वीचा इतिहास काय आहे?
उत्पत्ती1:1 च्या आधी स्वर्गातील दृश्य पहावयास मिळते.
सर्वात प्रथम स्वर्गात कुठल्याच दुताची अथवा करूबीम ह्यांची सृष्टी देखील झाली नव्हती त्याच्या आधी पासुन देव जो एलोहीम तो होता, ना त्याची सुरुवात आहे ना त्याचा अंत आहे म्हणूनच तो सर्व समर्थ देव आहे.
त्याच्या मनामध्ये तुमच्या आमच्या विषयी चांगले विचार होते म्हणूनच आमची नावे जगाच्या स्थापनेपुर्वी कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात तेव्हाच लिहिलेली होती.
जे त्याच्या मनात विचार होते त्या प्रमाणे त्याने कृती करण्यास सुरुवात केली. सर्वात प्रथम त्याने आपल्या उपासनेसाठी स्वर्गीय दिव्यदुत ह्यांची निर्मिती केली,करुब चार प्राणी व असंख्य दुतांची निर्मिती केली.
ह्या सर्वामध्ये लुसिफर, मिखायल व गब्रीयल हे अनुक्रमे ज्येष्ठ होते. सर्व जण रात्र-दिवस त्या प्रभु परमेश्वराची स्तुती आराधना करीत होते.
पुढे ह्या सर्वामध्ये जो ज्येष्ठ व सामर्थ्यशाली लुसिफर दुत ह्याच्या मध्ये स्वार्थ आणि गर्व आला की मी सुध्दा माझे सिंहासन उंच करीन व मी सुध्दा ह्याच्याहून अधिक माझी आराधना करून घेईन. त्याच्या मध्ये हा विचार ह्या साठी आला कारण परमेश्वराने त्याला सर्व दिव्य दुतापेक्षा अधिक सामर्थ्यशाली बनवले होते त्याच आधारे त्याने पुष्कळ दुतांना आपल्या बाजूने खेचून घेतले होते. परमेश्वराने त्याच्या मनातील विचार ओळखुन त्याला, त्याच्या सिंहासनावरून, स्वर्गातून खाली ढकलून दिले. (यहजक्केल २८ व्या अध्यायात ह्याचे वर्णन पहावयास मिळेल.)
निघते वेळी त्याने पुष्कळ दुतांना आपल्या बरोबर घेतले. बायबल मध्ये ह्या सर्व दुतांना सैन्य (असंख्य दुष्ट आत्मे )म्हणुन संबोधले जाते.
निघते वेळी लुसिफर जो दुत होता त्याच्या मधले सामर्थ्य काढून घेतले नाही, म्हणुनच आज त्याच सामर्थ्याने त्याने संपुर्ण जगावर, मानव जातीवर अधिकार गाजवलेला आहे.
जरी तो दुष्ट आत्म्याने सामर्थ्यवान असला तरी मर्त्य मनुष्य ह्या द्वारे त्याचा पराभव करण्यासाठी देवाने सृष्टीची व मानवाची निर्मिती केली.
Comments
Post a Comment