बायबलच्या प्रत्येक पुस्तकात येशू

 बायबलच्या प्रत्येक पुस्तकात येशू ख्रिस्त

 जुन्या करारात येशू ख्रिस्त




  • उत्पत्तीमध्ये, येशू ख्रिस्त हा स्त्री चा बीज आहे.
  • निर्गम मध्ये, तो वल्हांडणचा कोकरू आहे.
  • लेवीय मध्ये तो आमचा मुख्य याजक आहे.
  • गणना मध्ये तो दिवसा ढग आणि रात्री अग्निस्तंभ आहे
  • अनुवाद मध्ये, तो मोशे सारखा संदेष्टा आहे.
  • यहोशवा मध्ये, तो परमेश्वराच्या सैन्याचा सेनापती आहे.
  • शास्ते मध्ये तो आमचा न्यायाधीश आहे.
  • रूथ मध्ये, तो आमचा जवळचा सोडवणारा नातेवाईक आहे.
  • 1 आणि 2 शमुवेलमध्ये, तो विश्वासू संदेष्टा आहे.
  • राजे आणि इतिहासात तो आमचा राजा आहे.
  • एज्रा आणि नेहेम्या मध्ये,तो मानवी जीवनाच्या तुटलेल्या भिंतींचे पुनर्बांधणी करणारा आहे
  • एस्तेरमध्ये तो आमचा मर्दखय, आमचा वकील आहे.
  • ईयोब मध्ये तो आमचा सदैव जिवंत सोडवणारा आहे.
  • स्तोत्र संहीता मध्ये, तो आपला मेंढपाळ आहे.
  • नीतिसूत्रे मध्ये, तो आमचा ज्ञान आहे.
  • उपदेशकात, तो जीवनासाठीचा अर्थ आहे.
  • गीतरत्नात  तो आमचा प्रेमळ वर आहे
  • यशयामध्ये तो शांतीचा राजकुमार आहे
  • यिर्मया आणि विलापगीत मध्ये तो आमचा रडणारा संदेष्टा आहे.
  • यहेज्केल, मध्ये तेजस्वी मनुष्याचा पुत्र आहे.
  • दानीएल मध्ये, जीवनाच्या "अग्निमय भट्टी" मध्ये तो चौथा माणूस आहे.
  • होशेमध्ये तो पतित शी लग्न केले ला विश्वासू पती आहे
  • योएलमध्ये, तो पवित्र आत्म्याने व अग्नीने बाप्तिस्मा देणारा आहे.
  • आमोसमध्ये तो आमचा भार वाहणारा आहे.
  • ओबद्यामध्ये तो सामर्थ्यवान तारणारा आहे.
  • योना मध्ये, तो महान विदेशी सुवा्रतीक आहे.
  • मीखामध्ये तो बेथलेहेमहून जगाचा शासक आहे.
  • नहूममध्ये,तो आमचा गढ आहे.
  • हबक्कूकमध्ये तो पुनरुज्जीवनासाठी ओरडणारा पहारेकरी आहे
  • सफन्या,तो माझे रक्षण करणारा सामर्थ्यवान आहे
  • हाग्गईमध्ये,तो गमावलेला वारसा पुनर्संचयित करणारा आहे
  • जखर्या मध्ये तो दाविदाची शाखा आहे.
  • मलाखीमध्ये तो नीतिमान सूर्य त्याच्या पंखांमध्ये आरोग्य आहे.



Comments